Sukh Devasi Magave

सुख देवासी मागावे
सुख देवासी मागावे
दुःख देवाला सांगावे
दुःख देवाला सांगावे
सुख देवासी मागावे

देव मागे, देव पुढे
देव मागे, देव पुढे
देव आहे चोहीकडे

डोळे मिटुनी बघावे
डोळे मिटुनी बघावे
सुख देवासी मागावे
सुख देवासी मागावे

धाव घ्यावी देवापाशी
धाव घ्यावी देवापाशी
जशी माऊलीच्या कुशी

तान्हीयाने प्रेम प्यावे
तान्हीयाने प्रेम प्यावे
सुख देवासी मागावे
सुख देवासी मागावे

देव प्रेमळ-प्रेमळ
देव प्रेमळ
देव प्रेमळ-प्रेमळ
देव आरसा निर्मळ

बिंब तयांत पहावे
बिंब तयांत पहावे
सुख देवासी मागावे
सुख देवासी मागावे

दुःख देवाला सांगावे
दुःख देवाला सांगावे
सुख देवासी मागावे



Credits
Writer(s): Sudhir V Phadke
Lyrics powered by www.musixmatch.com

Link