Deshil Ka Re Majala

देशील का रे मजला क्षणभर?
पंख पाखरा, तुझे मनोहर
देशील का रे मजला क्षणभर?
पंख पाखरा, तुझे मनोहर
देशील का रे?

मधुर फळावर मोहरलेली
मधुर फळावर मोहरलेली
पर्णांतरी ही पल्लवलेली
चुंबित राहीन लज्जित लाली
तुझ्यासवे मी वृक्षलतेवर

देशील का रे मजला क्षणभर?
पंख पाखरा, तुझे मनोहर
देशील का रे?

तंव स्पर्शाने पुष्पकविना
तंव स्पर्शाने पुष्पकविना
भावमधुर ही सुस्वरताना
हास्य सुगंधित, सख्या-मोहना
उधळीत राहू प्रीतफुलावर

देशील का रे मजला क्षणभर?
पंख पाखरा, तुझे मनोहर
देशील का रे?

दमयंतीच्या प्रेमळ दूता
दमयंतीच्या प्रेमळ दूता
पंख तुझे ते मला लाभता
प्रिया, भेटण्या ही आतुरता
घेत भरारी बघ वायूवर

देशील का रे मजला क्षणभर?
पंख पाखरा, तुझे मनोहर
देशील का रे?



Credits
Writer(s): Meena Mangeshkar, P Savalaram
Lyrics powered by www.musixmatch.com

Link