Ghaal Sakhe Kharchala Aala

घाल सखे...
घाल सखे खर्चाला आळा जरा
करी माझ्या कष्टाची किंमत जरा
घाल सखे खर्चाला आळा जरा
करी माझ्या कष्टाची किंमत जरा

(करी माझ्या कष्टाची किंमत जरा)
(करी माझ्या कष्टाची किंमत जरा)

नको उडवू पैसा हा व्यर्थ असा
पुरा महिना बाजार मी पुरवू कसा?
तुझ्या उधळ्या हाताचा महिमा असा
रोज करितो माझा खाली खिसा

नको करू...
ए, नको करू पैशाचा ऐसा चुरा
करी माझ्या कष्टाची किंमत जरा
(करी माझ्या कष्टाची किंमत जरा)
(करी माझ्या कष्टाची किंमत जरा)

कुणी उडवी पैसा त्या मटक्यावरी
कुणी होई बेहोश त्या गुत्त्यावरी
पगाराच्या दिवशी मी येतोय घरी
तुझ्या हाती देतो कमाई पुरी

हवे सुख...
हवे सुख मजला मी येता घरा
करी माझ्या कष्टाची किंमत जरा
(करी माझ्या कष्टाची किंमत जरा)
(करी माझ्या कष्टाची किंमत जरा)

आधी होतो दोघेच राजा-राणी
आता खेळती दोन मुले अंगणी
नसे का गं चिंता तुला ही मनी?
व्हावी मुले ज्ञानी आणि सद्गुणी

एकटा...
ए, एकटा किती वाहू संसार धुरा?
करी माझ्या कष्टाची किंमत जरा
(करी माझ्या कष्टाची किंमत जरा)
(करी माझ्या कष्टाची किंमत जरा)

नको करू आता असे वागणे
कधी काय केले मी तुजला उणे
अशी साथ मजला तू दे साजणे
जसे चंद्र देते शीतल चांदणे

सदा वाहो.
ए, सदा वाहो संसारी प्रीतीझरा
करी माझ्या कष्टाची किंमत जरा
(करी माझ्या कष्टाची किंमत जरा)
(करी माझ्या कष्टाची किंमत जरा)
(करी माझ्या कष्टाची किंमत जरा)



Credits
Writer(s): Madhurkar Pathak, Satish Chakravarthy
Lyrics powered by www.musixmatch.com

Link