Don Divsacha Duniyet

दोन दिवसाचा दुनियेत तू पाहुणा
दोन दिवसाचा दुनियेत तू पाहुणा
(दोन दिवसाचा दुनियेत तू पाहुणा)
(दोन दिवसाचा दुनियेत तू पाहुणा)

बोल गर्वाचा बोलू नको रे उणा
बोल गर्वाचा बोलू नको रे उणा
(दोन दिवसाचा दुनियेत तू पाहुणा)
(दोन दिवसाचा दुनियेत तू पाहुणा)

सारे कळते परंतु अळे ना कसे
येथे वेळेला कोणी कुणाचे नसे
ऐसा गर्वाने बेभान होऊ नको
पाप पदरात बांधुनी घेऊ नको

दे हे सोडुनी अभिमान अहंपणा
(दोन दिवसाचा दुनियेत तू पाहुणा)
(दोन दिवसाचा दुनियेत तू पाहुणा)

समजुनी-उमजुनी वेडा झाला कसा
गुंतला मायाजाळी भल्या माणसा
नाही घटकेचा येथे तुझा भरवसा
खाली हातानं जाशील तू आला तसा

तुला नवजन्म मिळणार नाही पुन्हा
(दोन दिवसाचा दुनियेत तू पाहुणा)
(दोन दिवसाचा दुनियेत तू पाहुणा)

सूर्य पहाटेचा संध्याकाळी मावळे
खेळ परमेश्वराचे जगा वेगळे
मृत्यू ची घडी टाळता ना टळे
भक्ती कर वेड्या, भक्तीने मुक्ती मिळे

टाक तोडून मायेच्या या बंधना
(दोन दिवसाचा दुनियेत तू पाहुणा)
(दोन दिवसाचा दुनियेत तू पाहुणा)

माता-पिता, बहीण-भाऊ, लेकी-सुना
कोणीही संगती शेवटी येई ना
घे फुकाचे हरिनाम घे भास्करा
वार जाशील करशील भवसागरा

येथे राहील तुझी ती कविकल्पना
(दोन दिवसाचा दुनियेत तू पाहुणा)
(दोन दिवसाचा दुनियेत तू पाहुणा)

बोल गर्वाचा बोलू नको रे उणा
हे, बोल गर्वाचा बोलू नको रे उणा
(दोन दिवसाचा दुनियेत तू पाहुणा)
(दोन दिवसाचा दुनियेत तू पाहुणा)
(दोन दिवसाचा दुनियेत तू पाहुणा)



Credits
Writer(s): Madhurkar Pathak, Sahebrao Kokate
Lyrics powered by www.musixmatch.com

Link