Bandini

रसिक हो नमस्कार, मी शांताराम नांदगावकर
आपलं स्वागत करतो
जवळ-जवळ दीड तपापुर्वी
ससा तो ससा, रुपेरी वाळूत, माडांच्या बनात

रजनीगंधा जीवनी या बहरूनी आली
इत्यादी भावगीतांनी मी, अरुण पौडवाल
आणि अनुराधा पौडवाल एकत्र आलो
आपणही आमच्या कलाकृतींना

मोठ्या रसिकतेने दाद दिली
आणि अनेक भावगीतांची बरसात
आम्ही तुमच्यावर केली
पण मध्यंतरीच्या काळात

आम्ही चित्रपट गीतांकडे वळलो
आणि त्या भावपूर्ण भावगीतांच्या
दुनियेतून जरा दुरच गेलो
पण मित्र हो, या जिवा-भावाच्या भावगीतांना
विसरून कसं चालेल?

आज पुन्हा मी, अरुण पौडवाल
अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर
तुमच्या सेवेला हजर आहो
बंदिनी या cassette द्वारे

बंदिनी या दूरदर्शन मालिकेतल्या
आमच्या शीर्षक गीताला
तर आपण इतकी मनापासून दाद दिली

आणि म्हणूनच, आम्ही भावनांची बांधिलकी जाणणाऱ्या
बंदिनीचं गीत पूर्ण स्वरूपात आपणासाठी लिहिलं
या गीतानेच आम्ही पुन्हा या भावगीताच्या दुनियेत
आमच्या शब्दसुरांची पुष्पांजली
आपणाला अर्पण करीत आहोत

बंदिनी, स्त्री ही बंदिनी
हृदयी पान्हा, नयनी पाणी
हृदयी पान्हा, नयनी पाणी
जन्मोजन्मीची कहाणी

हृदयी पान्हा, नयनी पाणी
बंदिनी, स्त्री ही बंदिनी

रूप बहिणीचे माया देई
वात्सल्यमूर्त आई होई
रूप बहिणीचे माया देई
वात्सल्यमूर्त आई होई

माहेरा सोडून येई, माहेरा सोडून येई
सासरी सर्वस्व देई

हृदयी पान्हा, नयनी पाणी
जन्मोजन्मीची कहाणी
हृदयी पान्हा, नयनी पाणी
बंदिनी, स्त्री ही बंदिनी

कधी सीता, कधी होई कुंती
सावित्रीची दिव्य शक्ती
कधी सीता, कधी होई कुंती
सावित्रीची दिव्य शक्ती

शकुंतला तूच होसी, शकुंतला तूच होसी
मीराही प्रीत दीवाणी

हृदयी पान्हा, नयनी पाणी
जन्मोजन्मीची कहाणी
हृदयी पान्हा, नयनी पाणी
बंदिनी, स्त्री ही बंदिनी

युगे-युगे भावनांचे धागे
जपावया मन तुझे जागे
युगे-युगे भावनांचे धागे
जपावया मन तुझे जागे

बंधने ही रेशमाची, बंधने ही रेशमाची
सांभाळी तीच मानिनी

हृदयी पान्हा, नयनी पाणी
जन्मोजन्मीची कहाणी
हृदयी पान्हा, नयनी पाणी
बंदिनी, स्त्री ही बंदिनी, बंदिनी, बंदिनी



Credits
Writer(s): Arun Paudwal, Santaram Nandgaonkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link