Ghan He Aale

घन हे आले गरजत-बरसत
घन हे आले गरजत-बरसत
गंध मनाचा खुलवित-फुलवित
गंध मनाचा खुलवित-फुलवित
घन हे आले गरजत-बरसत

धरती आतुर प्रणयी थरथर
मिलनास त्या साक्षी परिसर
धरती आतुर प्रणयी थरथर
मिलनास त्या साक्षी परिसर

अवखळ वारा छेडित जातो
अवखळ वारा छेडित जातो
सूर आगळे लहरत-विहरत
घन हे आले गरजत-बरसत

मैफिलीत पाचूच्या हिरव्या
मैफिलीत पाचूच्या हिरव्या
पदन्यास हा सौदामिनीचा
पदन्यास हा सौदामिनीचा

लयीत सरींच्या संगे रिमझिम
लयीत सरींच्या संगे रिमझिम
पर्जन्याचा नाद अनाहत
घन हे आले गरजत-बरसत
घन हे आले गरजत-बरसत

चैतन्याची पखरण अनिमिष
आसमंत मग रंगीत-गंधित
आसमंत मग रंगीत-गंधित

वेलीवरती थरारे ही
नवा लेवुनी साज सलज्जित
घन हे आले गरजत-बरसत
घन हे आले गरजत-बरसत

घन हे आले गरजत-बरसत
गरजत-बरसत, गरजत-बरसत



Credits
Writer(s): Vivek Kajarekar, Jayashri Ambaskar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link