Tu Pavsachi Sar

तु पावसाची सर
तु पावसाची सर भेगाळल्या भुईवर
तु पावसाची सर भेगाळल्या भुईवर

तुझ्या स्पर्शाने-स्पर्शाने
तुझ्या स्पर्शाने-स्पर्शाने कणाकणात अंकुर
तु पावसाची सर भेगाळल्या भुईवर

तु मध्यान्हीची छाया
तु मध्यान्हीची छाया, तु काठोकाठ माया
तुझ्या मिठीत-मिठीत शीण विसरते काया
तु पावसाची सर भेगाळल्या भुईवर

तु मोगऱ्याचे फूल
तु मोगऱ्याचे फूल, एक सुगंधी चाहूल
एक सुगंधी चाहूल
तुझ्या श्वासांची-श्वासांची पडे काळजाला भूल
तु पावसाची सर भेगाळल्या भुईवर

तु निराळीच काही
तु निराळीच काही, तोड नाही, तोड नाही
तोड नाही, तोड नाही
माझी आहेस-आहेस हीच युगांची पुण्याई
तु पावसाची सर भेगाळल्या भुईवर
तु पावसाची सर भेगाळल्या भुईवर



Credits
Writer(s): Vivek Kajarekar, Prasann Shebekar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link