Kalokh Daatuni Aala

काळोख दाटूनी आला, पालखी उतरूनी ठेवा
काळोख दाटूनी आला, पालखी उतरूनी ठेवा
बदलून जरा घ्या खांदा, जायचे दूरच्या गावा
काळोख दाटूनी आला, पालखी उतरूनी ठेवा
...पालखी उतरूनी ठेवा

दरडही तमाणे गिळली, पानांची मिटली इरली
दरडही तमाणे गिळली, पानांची मिटली इरली

खडकाळ वाट ही इथे ही शेवाळ कुठे ओलावा

काळोख दाटूनी आला, पालखी उतरूनी ठेवा
...पालखी उतरूनी ठेवा

भुंकती श्वान भवताली, नागांसम दिसती वेली
भुंकती श्वान भवताली, नागांसम दिसती वेली

काजवा कुठे तळमळतो, मधूनीच घुमतसे रावा

काळोख दाटूनी आला, पालखी उतरूनी ठेवा
...पालखी उतरूनी ठेवा

आभाळ लयाला गेले, किरणांचे पक्षी मेले
आभाळ लयाला गेले, किरणांचे पक्षी मेले

पायांची चाळण झाली, कुठवरी मार्ग चालावा?

काळोख दाटूनी आला, पालखी उतरूनी ठेवा
बदलून जरा घ्या खांदा, जायचे दूरच्या गावा
काळोख दाटूनी आला, पालखी उतरूनी ठेवा

...पालखी उतरूनी ठेवा
...पालखी उतरूनी ठेवा



Credits
Writer(s): Shantaram Nandgavkar, Ashok Patki
Lyrics powered by www.musixmatch.com

Link