Kashi Javoo Mee Virndavanta

कशी जाऊ मी वृंदावना?
कशी जाऊ मी वृंदावना?
मुरली वाजवी गं कान्हा
मुरली वाजवी गं कान्हा
मुरली वाजवी गं कान्हा

पैलतीरी हरी वाजवी मुरली
पैलतीरी हरी वाजवी मुरली, वाजवी मुरली
नदी भरली यमुना, यमुना
नदी भरली यमुना

मुरली वाजवी गं कान्हा
मुरली वाजवी गं कान्हा

कासे-पीतांबर, कस्तुरी टिळक
कासे-पीतांबर, कस्तुरी टिळक
कुंडल शोभे काना
कुंडल शोभे काना

मुरली वाजवी गं कान्हा
मुरली वाजवी गं कान्हा

काय करू बाई, कोणाला सांगू?
काय करू बाई, कोणाला सांगू?
नामाची सांगड आणा
नामाची सांगड आणा

नंदाच्या हरीने कौतुक केले
नंदाच्या हरीने कौतुक केले
जाणे अंतरीच्या खुणा गं
जाणे अंतरीच्या खुणा

मुरली वाजवी गं कान्हा
मुरली वाजवी गं कान्हा

एका जनार्दनी मनी म्हणा
एका जनार्दनी मनी म्हणा
देव महात्म्य कळे ना कोणा
देव महात्म्य कळे ना कोणा

मुरली वाजवी गं कान्हा
मुरली वाजवी गं कान्हा

कशी जाऊ मी वृंदावना?
कशी जाऊ मी वृंदावना?
मुरली वाजवी गं कान्हा
मुरली वाजवी गं कान्हा



Credits
Writer(s): Eknath Sant, Bhatkar Snehal
Lyrics powered by www.musixmatch.com

Link