Ajun Sajana Mee Dhakti

अजून सजना...
अजून सजना, मी धाकटी, धाकटी
अजून सजना, मी धाकटी, धाकटी
नका येऊ असे अंगचटी
अवचित सख्या, लचकेल कोवळी कटी

अजून सजना...
अजून सजना...

(ए, माझ्या सजना तू रं, माझ्या राया तू रं)
(माझ्या सजना तू रं, माझ्या राया तू रं)

नुकतीच कुठे मी शिकली घ्याया पदर
(व्हंय जी, व्हंय जी, व्हंय जी)
नुकतीच कुठे मी शिकली घ्याया पदर
हळूहळू लागली कळू इश्काची नजर
हळूहळू लागली कळू इश्काची नजर

नका धरू मूठ मनगटी
नका धरू मूठ मनगटी
"नको-नको, हा, नको-नको"
कितिकदा म्हणू? फिरवू हनुवटी

अजून सजना...
अजून सजना...

(ए, माझ्या सजना तू रं, माझ्या राया तू रं)
(माझ्या सजना तू रं, माझ्या राया तू रं)

भय भारी घालिते मला
तुमची ही दिठी, तुमची ही दिठी
(तुमची ही दिठी, तुमची ही दिठी)
अडदांड जात पुरुषांची

दुष्ट शेवटी, दुष्ट शेवटी
(दुष्ट शेवटी, दुष्ट शेवटी)
बाळपणाची उतरते उटी (व्हंय जी)
बाळपणाची उतरते उटी

इश्काची गुणी-गोविंदा...
इश्काची गुणी-गोविंदा पाजितो गुटी
अजून सजना...
अजून सजना, मी धाकटी, धाकटी



Credits
Writer(s): G D Madgulkar, Sudhir V Phadke
Lyrics powered by www.musixmatch.com

Link