Sarkha Vatat Hota

सारखं वाटत होतं तुम्ही भेटाल असं
सारखं वाटत होतं तुम्ही भेटाल असं
मनी आलं तसं, अगदी झालं कसं
(मनी आलं तसं, अगदी झालं कसं) बापूराव!

पाहून तुम्हाला गेलं मन मोहून, मन मोहून
किती वेळ न्हाहाळू उभी अशी राहून?
(किती वेळ न्हाहाळू उभी अशी राहून?)
(हो, उभी अशी राहून?)

साऱ्या अंगामधी, हा-हा-हा
साऱ्या अंगामधी भरलं हसं
भरलं हसं, एक भरलं हसं
(मनी आलं तसं, अगदी झालं कसं)
(मनी आलं तसं, अगदी झालं कसं) बापूराव!

आन-मान कशाचा? coat अंगीचा काढा
या बसा पलंगी, जवळ मजसी ओढा

दूर राहू किती, हो-ओ
दूर राहू किती झाले कासावीस
कासावीस, झाले कासावीस
(मनी आलं तसं, अगदी झालं कसं)
(मनी आलं तसं, अगदी झालं कसं) बापूराव!

कामधाम राहू द्या, करा गडे मुक्काम
एक रात तरी जिवलगा, करा आराम

माझ्या मऊ भुजा, हा-हा-हा
माझ्या मऊ भुजा करा खुस
करा खुस, यांचं करा उस
(मनी आलं तसं, अगदी झालं कसं)
(मनी आलं तसं, अगदी झालं कसं) बापूराव!



Credits
Writer(s): G D Madgulkar, Sudhir V Phadke
Lyrics powered by www.musixmatch.com

Link