Ratris Roj Chale

रात्रीस खेळ चाले या गूढ चांदण्यांचा
रात्रीस खेळ चाले या गूढ चांदण्यांचा
संपेल ना कधी ही हा खेळ सावल्यांचा
हा खेळ सावल्यांचा, हा खेळ सावल्यांचा

रात्रीस खेळ चाले या गूढ चांदण्यांचा
संपेल ना कधी ही हा खेळ सावल्यांचा
—हा खेळ सावल्यांचा

हा चंद्र ना स्वयंभू, रवि तेज वाहतो हा
ग्रहणात सावल्यांचा अभिशाप भोगतो हा
हा चंद्र ना स्वयंभू, रवि तेज वाहतो हा
ग्रहणात सावल्यांचा अभिशाप भोगतो हा

प्रीतीस होई साक्षी हा दूत चांदण्यांचा
हा खेळ सावल्यांचा, हा खेळ सावल्यांचा

रात्रीस खेळ चाले या गूढ चांदण्यांचा
संपेल ना कधी ही हा खेळ सावल्यांचा
—हा खेळ सावल्यांचा

आभास सावली हा असतो खरा प्रकाश
आभास सावली हा असतो खरा प्रकाश
जे सत्य भासती ते असती नितांत भास

हसतात सावलीला हा दोष आंधळ्यांचा
संपेल ना कधी ही हा खेळ सावल्यांचा
—हा खेळ सावल्यांचा

या साजिऱ्या क्षणाला का आसवे दिठीत?
मिटतील सर्व शंका...
मिटतील सर्व शंका उबदार या मिठीत

गवसेल सूर अपुल्या या धूंद जीवनाचा
हा खेळ सावल्यांचा, हा खेळ सावल्यांचा

रात्रीस खेळ चाले या गूढ चांदण्यांचा
संपेल ना कधी ही हा खेळ सावल्यांचा
—हा खेळ सावल्यांचा



Credits
Writer(s): Sudhir Moghe, Hridaynath Mangeshkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link