Aala Aala Vara

आला-आला वारा संगे पावसाच्या धारा
पाठवणी करा सया निघाल्या सासुरा
सया निघाल्या सासुरा

आला-आला वारा संगे पावसाच्या धारा
पाठवणी करा सया निघाल्या सासुरा
सया निघाल्या सासुरा

आला-आला वारा संगे पावसाच्या धारा
पाठवणी करा सया निघाल्या सासुरा
सया निघाल्या सासुरा
आला-आला वारा...

नव्या नवतीचं बाई लकाकतं रूप
नव्या नवतीचं बाई लकाकतं रूप
माखलं गं ऊन जणू हळदीचा लेप
माखलं गं ऊन जणू हळदीचा लेप

ओठी हासू पापणीत आसवांचा झरा
आला-आला वारा संगे पावसाच्या धारा
पाठवणी करा सया निघाल्या सासुरा
सया निघाल्या सासुरा
आला-आला वारा...

आजवरी यांना किती जपलं-जपलं
काळजाचं पानी किती शिपलं-शिपलं
आजवरी यांना किती जपलं-जपलं
आजवरी यांना किती जपलं-जपलं
काळजाचं पानी किती शिपलं-शिपलं

चेतवून प्राण यांना दिला गं उबारा
आला-आला वारा संगे पावसाच्या धारा
पाठवणी करा सया निघाल्या सासुरा
सया निघाल्या सासुरा
आला-आला वारा...

येगळी माती आता, गं येगळी दुनिया
येगळी माती आता, गं येगळी दुनिया
आभाळाची माया बाई करील किमया

फुलंल बाई पावसानं मुलुख गं सारा
आला-आला वारा संगे पावसाच्या धारा
पाठवणी करा सया निघाल्या सासुरा
सया निघाल्या सासुरा

आला-आला वारा संगे पावसाच्या धारा
पाठवणी करा सया निघाल्या सासुरा
सया निघाल्या सासुरा
सया निघाल्या सासुरा
सया निघाल्या सासुरा



Credits
Writer(s): Sudhir Moghe, Hridaynath Mangeshkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link