Jagannathahuni Thor

जगन्नाथाहुनी थोर माऊलीची थोरी
बाळा, माऊलीची थोरी
जिच्या हाती हाले, बाळा, पाळण्याची दोरी
बाळा, पाळण्याची दोरी

सूर्य चंद्रमा दोन्ही नयनी
उषा पौर्णिमा दोन्ही वदनी
तिच्या उरी ओथंबते दुधेची शिदोरी
बाळा, दुधेची शिदोरी

जगन्नाथाहुनी थोर माऊलीची थोरी
बाळा, माऊलीची थोरी
जिच्या हाती हाले, बाळा, पाळण्याची दोरी
बाळा, पाळण्याची दोरी

बोल पहिला तीच बोलवी
हाती धरुनी तीच चालवी
तीच गुरू बालकाचा पहिला संसारी
बाळा, पहिला संसारी

राम न झाला कौसल्येविन
कृष्ण कोण रे देवकीनंदन?
बीज-रोप सांभाळी ती पुरुषार्थ चारी
बाळा, पुरुषार्थ चारी

जगन्नाथाहुनी थोर माऊलीची थोरी
बाळा, माऊलीची थोरी
जिच्या हाती हाले, बाळा, पाळण्याची दोरी
बाळा, पाळण्याची दोरी



Credits
Writer(s): G D Madgulkar, Sudhir V Phadke
Lyrics powered by www.musixmatch.com

Link