Dayaghana

दयाघना
दयाघना, का तुटले चिमणे घरटे?
उरलो बंदी असा मी, दयाघना

अरे जन्म बंदिवास, सजा इथे प्रत्येकास
अरे जन्म बंदिवास, सजा इथे प्रत्येकास
चुके ना कुणास, आता बंदी तुझा मी, दयाघना

दहा दिशांची कोठडी, मोहमाया झाली वेडी
दहा दिशांची कोठडी, मोहमाया झाली वेडी
प्राण माझे ओढी, झालो बंदी असा मी, दयाघना

बालपण उतू गेले अन् तारुण्य नासले
बालपण उतू गेले अन् तारुण्य नासले
वार्धक्य साचले, उरलो बंदी पुन्हा मी

दयाघना का तुटले चिमणे घरटे?
उरलो बंदी असा मी, दयाघना



Credits
Writer(s): Sudhir Moghe, Hridaynath Mangeshkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link