Hi Kashan Dhundi Aali

ही कशानं धुंदी आली?
ही कशानं धुंदी आली?
काही समजं ना, काही उमजं ना
काही समजं ना, काही उमजं ना

ह्यो चांद नभी, ही पुनव उभी
रेशमी धुक्यानं न्हाली
ही कशानं धुंदी आली?
ही कशानं धुंदी आली?

किरणांचा पिसारा फुलतो रं
जीव अंतराळी ह्यो झुलतो गं
किरणांचा पिसारा फुलतो रं
जीव अंतराळी ह्यो झुलतो गं

मन हुरहुरलं, का बावरलं?
ही कशाची जादू झाली?

काही समजं ना, काही उमजं ना
काही समजं ना, काही उमजं ना

ह्यो चांद नभी, ही पुनव उभी
रेशमी धुक्यानं न्हाली
ही कशानं धुंदी आली?
ही कशानं धुंदी आली?

ही कुजबुज, कुजबुज कसली?
ही पान खुदुखुदु हसली
ही कुजबुज, कुजबुज कसली?
ही पान खुदुखुदु हसली

लाडी-गोडी बघुन, छेडा-छेडी करून
चांद लबाड हसतो गाली

काही समजं ना, काही उमजं ना
काही समजं ना, काही उमजं ना

ह्यो चांद नभी, ही पुनव उभी
रेशमी धुक्यानं न्हाली
ही कशानं धुंदी आली?
ही कशानं धुंदी आली?

लई टिपूर-टिपूर ही रात अशी
आली पिरतीचं गाणं गात जशी
लई टिपूर-टिपूर ही रात अशी
आली पिरतीचं गाणं गात जशी

दोन्ही डोळं मिटून, आज आली कुठुन?
मला गुलाबी कोडं घाली

काही समजं ना, काही उमजं ना
काही समजं ना, काही उमजं ना

ह्यो चांद नभी, ही पुनव उभी
रेशमी धुक्यानं न्हाली
ही कशानं धुंदी आली?
ही कशानं धुंदी आली?



Credits
Writer(s): Jagdish Khebudkar, Ram Kadam
Lyrics powered by www.musixmatch.com

Link