Aalya Aalya Jau Naka

आल्या-आल्या जावू नका
आल्या-आल्या जावू नका
असं घाई-घाई येवू नका
असं घाई-घाई येवू नका

जावू नका, जावू नका, जावू नका
नं भाव फुक्कटचा खावू नका
आल्या-आल्या जावू नका

म्हणाल मजला मनकवडी तू
ओळखते मी मनीचा हेतू
म्हणाल मजला मनकवडी तू
ओळखते मी मनीचा हेतू

तृप्त कराया इच्छा मनीची
नुसत्या नोटा
दावू नका, दावू नका, दावू नका
नं भाव फुकटचा खावू नका
आल्या-आल्या जावू नका

बघता का हो, चोरावाणी?
पाठी तुमच्या लागलंय कोणी
हो, बघता का हो, चोरावाणी?
पाठी तुमच्या लागलंय कोणी

करून चोरी वर शिरजोरी
डोळं वटारून
पाहू नका, पाहू नका, पाहू नका
नं भाव फुक्कटचा खावू नका
आल्या-आल्या जावू नका

तुमचं-आमचं जमलं नात
तोंडावर का ठेवताय हात?
तुमचं-आमचं जमलं नात
तोंडावर का ठेवताय हात?

बसून या हो, मंदिरात
बाहेर गिरक्या
घेवू नका, घेवू नका, घेवू नका
नं भाव फुक्कटचा खावू नका
आल्या-आल्या जावू नका



Credits
Writer(s): Raam Laxman, Dada Kondke
Lyrics powered by www.musixmatch.com

Link