Zalya Tinhisaanjha

झाल्या तिन्ही सांजा करून शिणगार साजा
वाट पहाते मी गं, येणार साजन माझा
झाल्या तिन्ही सांजा करून शिणगार साजा
वाट पहाते मी गं, येणार साजन माझा

प्रीतीच्या दरबारीचं येणारं सरदार
मायेच्या मिठीचा त्यांच्या गळ्यात घालीन हार
प्रीतीच्या दरबारीचं येणारं सरदार
मायेच्या मिठीचा त्यांच्या गळ्यात घालीन हार

दिल्लाच्या देव्हाऱ्यात बांधीन मी पूजा
वाट पहाते मी गं, येणार साजन माझा

भेटीत रायाच्या सांगेन मी सारं
सोसवेना बाई मला यौवणाचा भार
भेटीत रायाच्या सांगेन मी सारं
सोसवेना बाई मला यौवणाचा भार

तान्हेल्या हरणीला हळुच पाणी पाजा
वाट पहाते मी गं, येणार साजन माझा

त्यांच्याच ओठांचा ओठी रंग लाल
आठवणीने त्यांच्या बाई, रंगले हे गाल
त्यांच्याच ओठांचा ओठी रंग लाल
आठवणीने त्यांच्या बाई, रंगले हे गाल

धुंद व्हावी राणी, रंगून जावा राजा
वाट पहाते मी गं, येणार साजन माझा

वाटत सख्याचं वाजलं पाऊल
खट्याळ मनाला लागे खोटीचं चाहूल
वाटत सख्याचं वाजलं पाऊल
खट्याळ मनाला लागे खोटीचं चाहूल

घालू कशी मी साद? होईल गाजा-वाजा
वाट पहाते मी गं, येणार साजन माझा

इचारच पडला बिचाऱ्या मनाला
वेळ का गं व्हावा बाई, सख्या-सजनाला?
इचारच पडला बिचाऱ्या मनाला
वेळ का गं व्हावा बाई, सख्या-सजनाला?

बिलगून बसावी शंभूला सारदा
वाट पहाते मी गं, येणार साजन माझा

झाल्या तिन्ही सांजा करून शिणगार साजा
वाट पहाते मी गं, येणार साजन माझा
झाल्या तिन्ही सांजा करून शिणगार साजा
वाट पहाते मी गं, येणार साजन माझा



Credits
Writer(s): Raam Laxman, Dada Kondke
Lyrics powered by www.musixmatch.com

Link