Soor Sanait Nadavala

सूर सनईत नादावला

सूर सनईत नादावला
पूर नयनांत या दाटला
सांग विसरू कशी मी तुला?
सूर सनईत नादावला

पुण्यवंतापरी या घरी जन्मले
सात जन्मांतले भाग्य जे लाभले

सात या पाऊली विस्मरू मी कशी?
मूर्त आई तुझी वत्सला
सूर सनईत नादावला

सान होते कशी मूक वेडी कळी
अमृताने तुझ्या वाढले मी खुळी

रोमरोमी जयाच्या तुझ्या भावना
गंध विसरेल का गे फुला?
सूर सनईत नादावला

पूस डोळे, नको हुंदके-आसवे
चालले गे जरी मी पतीच्यासवे

माऊली तू मला साऊली जीवनी
मी तुझी लाडकी प्रेमला

सूर सनईत नादावला
पूर नयनांत या दाटला
सांग विसरू कशी मी तुला?
सूर सनईत नादावला



Credits
Writer(s): Mohile Anil, Arun Chiluveru
Lyrics powered by www.musixmatch.com

Link