Hari Nam Mukhi Rangate

"हरिनाम" मुखी रंगते
एकतारी करी वाजते
"हरिनाम" मुखी रंगते
एकतारी करी वाजते

विनविते मी तुला भाववेडी मीरा
गोड नामी तुझ्या दंगते

घरट्यात माझिया आनंदाचा ठेवा
तूच यदुनाथा सदा असू द्यावा
घरट्यात माझिया आनंदाचा ठेवा
तूच यदुनाथा सदा असू द्यावा

इतुकेच मागणे तुझ्यापाशी मी मागते
गोड नामी तुझ्या दंगते

काम, क्रोध, मत्सर कधी ना पाहिले
लोभ, मोह सारे दूर मी सारिले
काम, क्रोध, मत्सर कधी ना पाहिले
लोभ, मोह सारे दूर मी सारिले

हरीच्याच चिंतनी जीवनास मी वाहते
गोड नामी तुझ्या दंगते

"हरिनाम" मुखी रंगते
एकतारी करी वाजते
विनविते मी तुला भाववेडी मीरा
गोड नामी तुझ्या दंगते



Credits
Writer(s): Anil Arun, Shantaram Nandgaokar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link