Ved Lagale Radhela

जो तो सांगे, ज्याला, त्याला
जो तो सांगे, ज्याला, त्याला
वेड लागले राधेला, वेड लागले राधेला

पितांबराची साडी ल्याली
मोर पिसांची करे काचोळी
पितांबराची साडी ल्याली
मोर पिसांची करे काचोळी

वेळी, अवेळी काजळ काळी
वेळी, अवेळी काजळ काळी
उटी लाविते मुख चंद्राला
वेड लागले राधेला, वेड लागले राधेला

विळखा, सुंदर कचश्रेणीचा
मुकुट चढविते फुलवेणीचा
विळखा, सुंदर कचश्रेणीचा
मुकुट चढविते फुलवेणीचा

हार अर्पिता मुक्तामणीचा
हार अर्पिता मुक्तामणीचा
मोडीत डोळे प्रतिबिंबाला
वेड लागले राधेला, वेड लागले राधेला

डुंबत अविरत यमुना डोही
राधेची ती कृष्णा होई
डुंबत अविरत यमुना डोही
राधेची ती कृष्णा होई

मिठी मारते ओलेतीही
मिठी मारते ओलेतीही
शेषशायी भगवंताला
वेड लागले राधेला, वेड लागले राधेला

जो तो सांगे, ज्याला, त्याला
जो तो सांगे, ज्याला, त्याला
वेड लागले राधेला, वेड लागले राधेला



Credits
Writer(s): Vasant Prabhu, P Savalaram
Lyrics powered by www.musixmatch.com

Link