Ka Hasala Kinara

का हासला किनारा?
का हासला किनारा, किनारा?
का हासला किनारा पाहून धुंद लाट?

पाहूनिया नभाला...
पाहूनिया नभाला का हासली पहाट?
पाहूनिया नभाला का हासली पहाट?

होती समोर माया गंभीर सागराची
होती समोर माया गंभीर सागराची
संगीत मर्मराचे...
संगीत मर्मराचे, किलबिल पाखरांची

काठावरी उभी मी...
काठावरी उभी मी, तू न्याहळीत पाठ
काठावरी उभी मी, तू न्याहळीत पाठ

चाहूल जाणिवेची स्पर्शातुनी गळाली
चाहूल जाणिवेची स्पर्शातुनी गळाली
भारावल्या कळीला जणू पाकळी मिळाली

कमलापरी जुळावे...
कमलापरी जुळावे ते स्वप्नरम्य हात
कमलापरी जुळावे ते स्वप्नरम्य हात

का हासला किनारा पाहून धुंद लाट?
पाहूनिया नभाला का हासली पहाट?
पाहूनिया नभाला का हासली पहाट?



Credits
Writer(s): Jagdish Khebudkar, Anil Arun
Lyrics powered by www.musixmatch.com

Link