Kashi Re Tula Bhetoon

कशी रे तुला भेटू मला वाटे लाज?
कशी रे तुला भेटू मला वाटे लाज?
लौकिक तुझा मोठा आणिक घरंदाज

कशी रे तुला भेटू मला वाटे लाज?
कशी रे तुला भेटू मला वाटे लाज?
लौकिक तुझा मोठा आणिक घरंदाज
कशी रे तुला भेटू...

करिती कुटाळकी तुझे ते टाळकरी
करिती कुटाळकी तुझे ते टाळकरी
साथीला देई साथ घरची एकतारी
साथीला देई साथ घरची एकतारी

भोवती निंदकांचे वाजती पखवाज
भोवती निंदकांचे वाजती पखवाज
लौकिक तुझा मोठा आणिक घरंदाज
कशी रे तुला भेटू...

ओळखते राया माझी मी पायरी
ओळखते राया माझी मी पायरी
बोलतील तुझी सोयरी धायरी
बोलतील तुझी सोयरी धायरी

जहरी बोलाचे हे जुळले तिरंदाज
जहरी बोलाचे हे जुळले तिरंदाज
लौकिक तुझा मोठा आणिक घरंदाज
कशी रे तुला भेटू...

होईल तेल-वात स्नेहात आपोआप
होईल तेल-वात स्नेहात आपोआप
जळेल जन्मोजन्मी प्रीतिचा नंदा दीप
जळेल जन्मोजन्मी प्रीतिचा नंदा दीप

वयात यौवनाचा...
वयात यौवनाचा विखुरला साज
लौकिक तुझा मोठा आणिक घरंदाज
कशी रे तुला भेटू मला वाटे लाज?
कशी रे तुला भेटू मला वाटे लाज?
लौकिक तुझा मोठा आणिक घरंदाज
कशी रे तुला भेटू...



Credits
Writer(s): Raja Badhe, Shrinivas Khale
Lyrics powered by www.musixmatch.com

Link