Paus Asa Udhaluni

पाऊस असा उधळूनी
पाऊस असा उधळूनी
धुंदी डोलत होता
देहाचे घेवून गलबत
बैरागी चालत होता

पाऊस असा विझलेला
प्राणाची जैसी ज्योत
मातीची टिचली पणती
अन खिन्न एकटी वात
पाऊस असा झिम्माडा
पाऊस असा झिम्माडा
बरसून रान आलेलं
ओटीत गार वेचून
एक नुकतं पान आलेलं

पाऊस असा बेभान
विस्कटली झापे सारी
निर्वस्त्र खोप वस्तीत
आभाळ उतरले दारी
पाऊस असा दीनवाणा
पाऊस असा दीनवाणा
"येतो, येतो, येतो," म्हणताना, "येतो," म्हणताना
पाऊस असा दीनवाणा
"येतो, येतो, येतो," म्हणताना, "येतो," म्हणताना

नुसताच आणतो आवड-आवड
नुसताच आणतो आवड
अन दिसतो केविलवाणा
पाऊस कधी अश्रूंचा
तो उष्ण किनारा होतो

मग आठवणींच्या भवती
भरपूर पसारा होतो
पाऊस असा विझलेला
पाऊस असा झिम्माडा
पाऊस असा दीनवाणा



Credits
Writer(s): Mangeshkar Hridyanath, N/a Graes
Lyrics powered by www.musixmatch.com

Link