Chimb Me Chimb Tu

चिंब मी, चिंब तू
तसाच भवती चिंब ऋतू

चिंब मी, चिंब तू
तसाच भवती चिंब ऋतू
गगन जसे, मनही तसे
ओथंबून मग जाई उतू

चिंब मी, चिंब तू
तसाच भवती चिंब ऋतू
गगन जसे, मनही तसे
ओथंबून मग जाई उतू
चिंब मी, चिंब तू

ओला-बोला संग जीवाला
हिरवा-हिरवा क्षणही आपला
तुझ्याचसाठी हा मी असला
हिरवाईचा ऋतू सजविला

ओ-हो, ओला-बोला संग जीवाला
हिरवा-हिरवा क्षणही आपला
तुझ्याचसाठी हा मी असला
हिरवाईचा ऋतू सजविला

पाऊस होऊनी क्षणात
मजला कवेत घेशी तू
गगन जसे, मनही तसे
ओथंबून मग जाई उतू

चिंब मी, चिंब तू
तसाच भवती चिंब ऋतू
गगन जसे, मनही तसे
ओथंबून मग जाई उतू
चिंब मी, चिंब तू

गुंफून मोती केसांवरती
पाऊस नाचे अधरावरती
गात्रांमधुनी वीजा नाचती
मनी निराळे भाव उमलती

हो, गुंफून मोती केसांवरती
पाऊस नाचे अधरावरती
गात्रांमधुनी वीजा नाचती
मनी निराळे भाव उमलती

शब्दावाचुन गूज मनीचे
नकळत सांगून जाशी तू
गगन जसे, मनही तसे
ओथंबून मग जाई उतू
चिंब मी, चिंब तू

हिरवी राने, मने गुलाबी
डोळ्यामधली नदी शराबी
हळवे गाणे, धुंद आलापी
श्वासामधुनी उसळे सुरभी

हिरवी राने, मने गुलाबी
डोळ्यामधली नदी शराबी
हळवे गाणे, धुंद आलापी
श्वासामधुनी उसळे सुरभी

सरी वाऱ्यातून तशीच देही
अलगद मिसळून जाशी तू
गगन जसे, मनही तसे
ओथंबून मग जाई उतू

चिंब मी, चिंब तू
तसाच भवती चिंब ऋतू
गगन जसे, मनही तसे
ओथंबून मग जाई उतू
चिंब मी, चिंब तू



Credits
Writer(s): Vivek Tendulkar, Aarti Gosavi
Lyrics powered by www.musixmatch.com

Link