Ek Tari Sange

एकतारी संगे एक रूप झालो
एकतारी संगे एक रूप झालो
आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो
आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो

(आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो)
(आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो)

गळामाळ शोभे आत्मरूप शांती
भक्ती-भाव दोन्ही धरू टाळ हाती

टिळा विरक्तीचा कपाळास ल्यालो
टिळा विरक्तीचा कपाळास ल्यालो
(आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो)
(आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो)

भुक भाकरीची, छाया झोपडीची
निवाऱ्यास घ्यावी उब गोधडीची

माया, मोह सारे उगाळून प्यालो
माया, मोह सारे उगाळून प्यालो
(आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो)
(आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो)

पुर्वपुण्य ज्याचे मिळे सुख त्याला
कुणी राव होई, कुणी रंक झाला

मागणे न काही, सांगण्यास आलो
मागणे न काही, सांगण्यास आलो
(आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो)
(आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो)

एकतारी संगे एक रूप झालो
(एकतारी संगे एक रूप झालो)
(आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो)
(आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो)



Credits
Writer(s): G D Madgulkar, Sudhir V Phadke
Lyrics powered by www.musixmatch.com

Link