He Asech Swapna Rahu De

हे असेच स्वप्न राहू दे
हे असेच स्वप्न राहू दे
लोचने भरून पाहू दे
वंचना सले मनात

ही अशीच प्रीत गाऊ दे
अशीच प्रीत गाऊ दे, गाऊ दे
हे असेच स्वप्न राहू दे

मी अबोल राहिले दुःख हे अजाणते
नकळता घडे तरी हा प्रमाद जाणते

संभ्रमात मी अजून
हे धुके विरून जाऊ दे
धुके विरून जाऊ दे, जाऊ दे
हे असेच स्वप्न राहू दे

काय दैव बापुडे आज मी अशी सुखी
काय दैव बापुडे आज मी अशी सुखी
लाभले मला परी मी सुखाचं पारखी

एकदाच गहिवरून
या दवांत चिंब न्हाऊ दे
दवांत चिंब न्हाऊ दे, न्हाऊ दे
हे असेच स्वप्न राहू दे

हे असेच स्वप्न राहू दे
हे असेच स्वप्न राहू दे
हे असेच स्वप्न राहू दे



Credits
Writer(s): Jagdish Khebudkar, Sudhir V Phadke
Lyrics powered by www.musixmatch.com

Link