Suvarna Dwaravaticha Rana

सुवर्ण द्वारावतीचा राणा, आ
श्रीहरी विदुराघरी पाहुणा
श्रीहरी विदुराघरी पाहुणा
विदुराघरी पाहुणा

मिष्टान्ने कोठुन? मिष्टान्ने कोठुन?
आणिला कणिकोंडा रांधुन
आणिला कणिकोंडा रांधुन
सांगे आवर्जुन भाबडी विदुराची सुगरण

वानी रुचकरपणा
श्रीहरी विदुराघरी पाहुणा

कवळ मुखी नेतसे
कवळ मुखी नेतसे
मागुनी पुन्हा-पुन्हा घेतसे
मागुनी पुन्हा-पुन्हा घेतसे

तृप्त मनी होतसे
तृप्तिची ढेकर वर देतसे

विसरे जलपाना
श्रीहरी विदुराघरी पाहुणा

प्रेमळपण आगळे
प्रेमळपण आगळे
चाटितो उरली-सुरली दळे
चाटितो उरली-सुरली दळे

योग्यांना ना मिळे
मूर्त ते परब्रह्म सावळे
मूर्त ते परब्रह्म सावळे

काय लाडकेपणा
श्रीहरी विदुराघरी पाहुणा, पाहुणा
विदुराघरी पाहुणा
श्रीहरी विदुराघरी पाहुणा



Credits
Writer(s): G D Madgulkar, P L Deshpande
Lyrics powered by www.musixmatch.com

Link