Kadhi Kadhi

ਰੱਬਾ ਮੇਰੇ, ਮੈਂ ਕੀ ਕਰਾਂ? ਹਾਏ
इस दिल की लगी
ਇਸ਼ਕ ਦਾ ਰੋਗ ਬੜਾ ਬੇਦਰਦੀ, ਹਾਏ
ज़िंदगी ना रही सगी

कधी-कधी नजर का भिजते?
कधी-कधी आस का निजते?
कधी-कधी मळभ मी होतो?
कधी-कधी...

कधी-कधी वादळी वारे
कधी-कधी कोरडे किनारे
कधी-कधी उर का भरतो?
कधी-कधी...

का हरलो असे, ना उरले ठसे
केविलवाणे कळेल तुला कधी?

कधी-कधी नजर का भिजते?
कधी-कधी आस का निजते?
कधी-कधी मळभ मी होतो?
कधी-कधी...

कधी-कधी वादळी वारे
कधी-कधी कोरडे किनारे
कधी-कधी उर का भरतो?
कधी-कधी...

हो, सारे तसे जागच्या जागी तरी देह उभा बैरागी
असशील तुही मग जागी, आहेस ना?
घर उभे एकटे आहे, वारा ही मुक्याने वाहे
जीव उगा उपाशी राहे, राहील ना?

का विझलो असे ना कळले कसे
मनी रात आता सरेल पुन्हा कधी?

कधी-कधी सूर का चुकतो?
कधी-कधी नेम का हुकतो?
कधी-कधी हात का सुटती
कधी-कधी...

कधी-कधी नजर का भिजते?
कधी-कधी आस का निजते?
कधी-कधी मळभ मी होतो?
कधी-कधी...

Hmm, जरी हवे-हवेसे होते ते तुझे नी माझे नाते
हे प्रेम कुठे मग जाते, गेलेच ना
त्या मधाळ राती सरल्या, तुटताना नाही कळल्या
चंदेरी काचा उरल्या, सांग का?

का रुसलो असे मन वेडे-पिसे
कुणी नाही आता येशील पुन्हा कधी?

कधी-कधी आठवणी वेड्या
कधी-कधी बंध हो बेड्या
कधी-कधी जीव घुसमटतो
कधी-कधी...

कधी-कधी नजर का भिजते?
कधी-कधी आस का निजते?
कधी-कधी मळभ मी होतो?
कधी-कधी, ओ



Credits
Writer(s): Nilesh Moharir, Ashwini Shende, Pankaj Pushkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link