Ek Kolha Bahu Bhukela

एक कोल्हा बहू भुकेला
फार होता कावरा
एक तुकडा परी ना त्याला
खावयासी गावला

एक कोल्हा बहू भुकेला
फार होता कावरा
एक तुकडा परी ना त्याला
खावयासी गावला

कोल्हा होता धूर्त, मतलबी
सावज शोधे तो भारे
शालू आणिक राधा त्याला
सापडल्या की शेजारी

त्याहून भारी नैना त्याची
खास सखी ऑफिसात
माझी ही मैत्रीण समीरा
भरलीया त्याच्या डोळ्यात

पण कोणीही भीक ना घाली
कुणी ना त्याला कावला
एक तुकडा परी ना त्याला
खावयासी गावला

मग सापडली कोल्ह्याला
त्याची वणातली योग्य दिशा
सापडली अबला एकटी
दुःखी-कष्टी एक निशा

नवरा गेला सोडूनी तिजला
कोल्हा मागे लागला
एक तुकडा आता त्याला
खावयासी गावला

एक तुकडा आता त्याला
खावयासी गावला



Credits
Writer(s): Nilesh Moharir, Pankaj Pushkar, Nimish Datt
Lyrics powered by www.musixmatch.com

Link