He Sawalya Ghana

हे, सावळ्या घना, हे, सावळ्या घना
का छेडिसी? मनाच्या अशा तारा पुन्हा-पुन्हा
हे, सावळ्या घना

पानातुनी या मोहुनी गाणे जलाचे फुले
गाण्यातुनी त्या दाटुनी, झेले फुलांचे हासले
वारा हळू हा प्रीती-स्वरानी झुलवी तृणा-तृणा
हे, सावळ्या घना

थेंबापरी या नाचवी पक्षी स्मृतींचा तुरा
त्या आठवानी भारले माझ्या मनाच्या अंबरा
आता प्रियाची चाहूल ऐसी भुलवी कणा-कणा

हे, सावळ्या घना
का छेडिसी? मनाच्या अशा तारा पुन्हा-पुन्हा
हे, सावळ्या घना, घना



Credits
Writer(s): Mohile Anil, Arun Chiluveru
Lyrics powered by www.musixmatch.com

Link