Varyavarti Ghet Lakeri

वाऱ्यावरती घेत लकेरी
वाऱ्यावरती घेत लकेरी
गात चालल्या जललहरी
वाऱ्यावरती घेत लकेरी

गात चालल्या जललहरी
वाऱ्यावरती घेत लकेरी

चहू दिशांना प्रेमरसांकित
चहू दिशांना प्रेमरसांकित
लकेर घुमवी सुरेल संगीत

अन् संध्येच्या गाली नकळत
स्वप्न रंगवी निलांबरी
वाऱ्यावरती घेत लकेरी

ताल धरोनी हरित तृणांचे
ताल धरोनी हरित तृणांचे
मोहक पाते मुरडत नाचे
मोहक पाते मुरडत नाचे

फुल होऊनी कुंदकळीचे
गंध उधळीते मोदभरी
वाऱ्यावरती घेत लकेरी

भेदभाव हे विसरुन सगळे
भेदभाव हे विसरुन सगळे
आनंदाने गायिलेले
आनंदाने गायिलेले

सप्त स्वरांचे गीत रंगले
सात वेगळ्या सरोवरी
वाऱ्यावरती घेत लकेरी
गात चालल्या जललहरी
वाऱ्यावरती घेत लकेरी



Credits
Writer(s): Dashrath Pujari, Ramesh Anavkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link