Utha Panduranga Aata

उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा
झाला अरुणोदय, सरली निद्रेची वेळा
(उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा)
(झाला अरुणोदय, सरली निद्रेची वेळा)

संत, साधू, मुनी अवघे झालेली गोळा
सोडा सेजसुख आता पाहू द्या मुखकमळा
रंगमंडपी महाद्वारी झालीसे दाटी
मन उतावेळ रूप पहावया दृष्टि

(उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा)
(झाला अरुणोदय, सरली निद्रेची वेळा)

राई रखुमाबाई तुम्हा येऊ द्या दया
सेजे हालवुनी जागे करा देवराया
गरुड, हनुमंत पुढे पाहती वाट
स्वर्गीचे सुरवर घेऊनि आले बोभाट

(उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा)
(झाला अरुणोदय, सरली निद्रेची वेळा)

झाले मुक्तद्वार, लाभ झाला रोकडा
विष्णुदास नामा उभा घेऊनि काकडा
(उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा)
(झाला अरुणोदय, सरली निद्रेची वेळा)

(उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा)
(झाला अरुणोदय, सरली निद्रेची वेळा)



Credits
Writer(s): Nandu Honap, Traditional
Lyrics powered by www.musixmatch.com

Link