Utha Arunadev Prakash Jhaala

उठा अरुणोदय प्रकाश झाला
घंटा-गजर गर्जीयला, घंटा-गजर गर्जीयला
(उठा अरुणोदय प्रकाश झाला)
(घंटा-गजर गर्जीयला, घंटा-गजर गर्जीयला)

हरी चौघडा सुरू झाला काकड आरती समयाचा
हरी चौघडा सुरू झाला काकड आरती समयाचा
(उठा अरुणोदय प्रकाश झाला)
(घंटा-गजर गर्जीयला, घंटा-गजर गर्जीयला)

महाद्वारी वैष्णव जण पुजा सामग्री घेऊन
आणि तयासी दर्शन बंदी जण गर्जती
सभा मंडपी कीर्तन घोष मृदंग-टाळ विणीसुरस
आनंद गाती हरीचे दास परमउल्लास करुनिया

(उठा अरुणोदय प्रकाश झाला)
(घंटा-गजर गर्जीयला, घंटा-गजर गर्जीयला)

चंद्रभागे वाळवंटी प्रातः स्नानाची जनदाटी
आता येतील आपुल्या भेटी उठी-उठी गोविंदा
ऐसी विनवी रुख्मिनी ताजुब झाली छत्रपाणी
नामा पद्धअंजुळी जोडुनी चरणी माथा ठेवीत असे

(उठा अरुणोदय प्रकाश झाला)
(घंटा-गजर गर्जीयला, घंटा-गजर गर्जीयला)
(उठा अरुणोदय प्रकाश झाला)
(घंटा-गजर गर्जीयला, घंटा-गजर गर्जीयला)



Credits
Writer(s): Nandu Honap, Traditional
Lyrics powered by www.musixmatch.com

Link