Wajavi Murli

वाजवी मुरली श्यामसुंदरा
वाजवी मुरली श्यामसुंदरा
तुझ्या मंदिरी नाचे मीरा, नाचे मीरा
वाजवी मुरली श्यामसुंदरा

करि करताळा, पायी घुंगुर
जन्म तुडविते हा क्षणभंगुर

देह नव्हे हा मोरपिसारा, मोरपिसारा
वाजवी मुरली श्यामसुंदरा

कसले कलियुग? मी द्वापारी
गोपवधू मी, तू कंसारी

कालिंदीचा रम्य किनारा, रम्य किनारा
वाजवी मुरली श्यामसुंदरा

वाजवी मुरली श्यामसुंदरा
तुझ्या मंदिरी नाचे मीरा, नाचे मीरा
वाजवी मुरली श्यामसुंदरा

गोपिनाथ तू, मी तर गोपी
पुण्यशील तुज, जगास पापी

आले-आले मी अभिसारा, मी अभिसारा
वाजवी मुरली श्यामसुंदरा

मिठीत मिटले विश्व मुकुंदा
मी आपणिले ब्रम्हानंदा

तू-मी दोघे अमृतधारा, अमृतधारा
वाजवी मुरली श्यामसुंदरा

वाजवी मुरली श्यामसुंदरा
वाजवी मुरली श्यामसुंदरा
तुझ्या मंदिरी नाचे मीरा, नाचे मीरा
वाजवी मुरली श्यामसुंदरा



Credits
Writer(s): G D Madgulkar, Sudhir V Phadke
Lyrics powered by www.musixmatch.com

Link