Panya Tujha Rang Kasa

पाण्या तुझा रंग कसा?
ज्याला जसा हवा तसा
ज्याला जसा हवा तसा
ज्याला जसा हवा तसा
पाण्या तुझा रंग कसा?

चांदराती चंद्रापरी
काळ्या राती कृष्णापरी
या रे कुणी तीरी बसा
ज्याचा त्याला दिसेल ठसा

पाण्या तुझा रंग कसा?
ज्याला जसा हवा तसा
ज्याला जसा हवा तसा
ज्याला जसा हवा तसा
पाण्या तुझा रंग कसा?

पाण्या तुझा गंध कसा?
मेळ ज्यासी घडे तसा
फेका तरी हार ताजा
मोगऱ्याचा वास माझा

चंदनाने चंदनसा, गंधकाने गंधकसा

पाण्या तुझा रंग कसा?
ज्याला जसा हवा तसा
ज्याला जसा हवा तसा
ज्याला जसा हवा तसा
पाण्या तुझा रंग कसा?

पाण्या तुझा स्वाद कसा?
ज्याला जसा हवा तसा
साखरेने गोड करा
द्राक्षरसे मधुर जरा

अमृताने अमृतसा, विषासवे विष जसा
येती किती, जाती किती
त्याची मला नाही भीती

वाहतसे नित्य असा
कुणी हसा, कुणी रुसा
कुणी हसा, कुणी रुसा रे
कुणी हसा, कुणी रुसा

पाण्या तुझा रंग कसा?
ज्याला जसा हवा तसा
ज्याला जसा हवा तसा
ज्याला जसा हवा तसा
पाण्या तुझा रंग कसा?

ज्याला जसा हवा तसा
पाण्या तुझा रंग कसा?



Credits
Writer(s): G D Madgulkar, Sudhir V Phadke
Lyrics powered by www.musixmatch.com

Link