Deva Daya Tujhi

देवा, दया तुझी की, ही शुद्ध दैवलीला
लागो न दृष्ट माझी माझ्याच वैभवाला
देवा, दया तुझी की, ही शुद्ध दैवलीला

भाळावरी बसे या निष्ठुर जी कुठार
घावातुनी उडावे कैसे सुधा तुषार?

निर्जीव जन्म माझा...
निर्जीव जन्म माझा या अमृतात न्हाला
लागो न दृष्ट माझी माझ्याच वैभवाला
देवा, दया तुझी...

माझ्या मुलास लाभे सुखछत्र रे पित्याचे
ही प्रीतीची कमाई की भाग्य नेणत्याचे

उध्वस्त मांडवाच्या...
उध्वस्त मांडवाच्या दारी वसंत आला
लागो न दृष्ट माझी माझ्याच वैभवाला
देवा, दया तुझी...

सौख्यात नांदताना का दुःख आठवावे?
जे नामशेष झाले ते काय साठवावे?

हास्यात आजच्या ह्या...
हास्यात आजच्या ह्या कळ कालची कशाला?
लागो न दृष्ट माझी माझ्याच वैभवाला
देवा, दया तुझी...



Credits
Writer(s): Shrinivas Khale, G D Madgulkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link