Gori Bahuli Kuthun Aali

गोरी बाहुली कुठुन आली?
कुशीमध्ये आईच्या ही कशी शिरली?
गोरी बाहुली कुठुन आली?
कुशीमध्ये आईच्या ही कशी शिरली?

झगा ना, साडी तशी...
झगा ना, साडी तशी नागडी
चड्डीदेखील कशी हिने नाही घातली
गोरी बाहुली कुठुन आली?
कुशीमध्ये आईच्या ही कशी शिरली?

उताणी पडे, तशीच रडे
उताणी पडे, तशीच रडे
डोळ्यांमधे हिच्या ओल्या निळाचे खडे
डोळ्यांमधे हिच्या ओल्या निळाचे खडे

पुशी ही धीट, गालीचे तीट
कुठे बाई ठेवावी ही जपूनी नीट?
कुठे बाई ठेवावी ही जपूनी नीट?

गोरी बाहुली कुठुन आली?
कुशीमध्ये आईच्या ही कशी शिरली?

कोण्या दुकानी होती ही राणी?
कोण्या दुकानी होती ही राणी?
पेटीविना तरी हिला आणली कोणी?
पेटीविना तरी हिला आणली कोणी?

छान रेखिले नाक-डोळुले
छान रेखिले नाक-डोळुले
लावायाचे केस हिला पार राहिले
लावायाचे केस हिला पार राहिले

आई गं, आई, मला ही देई
बदल्यात माझी सारी खेळणी घेई
बदल्यात माझी सारी खेळणी घेई

गोरी बाहुली कुठुन आली?
कुशीमध्ये आईच्या ही कशी शिरली?

हत्ती नी घोडे, कुत्री, माकडे
हत्ती नी घोडे, कुत्री, माकडे
सिनेमाची पेटीसुद्दा देईन, गडे
सिनेमाची पेटीसुद्दा देईन, गडे

पोर लाघवी मला ही हवी
पोर लाघवी मला ही हवी
हवी तर बाबांकडे माग तू नवी
हवी तर बाबांकडे माग तू नवी

गोरी बाहुली कुठुन आली?
कुशीमध्ये आईच्या ही कशी शिरली?
गोरी बाहुली कुठुन आली?
कुशीमध्ये आईच्या ही कशी शिरली?



Credits
Writer(s): Shrinivas Khale, G D Madgulkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link