Panyatale Pahata

पाण्यातले पहाता...
पाण्यातले पहाता प्रतिबिंब हासणारे
...प्रतिबिंब हासणारे

आले मनात नवखे...
आले मनात नवखे उमलून भाव सारे
पाण्यातले पहाता प्रतिबिंब हासणारे
...प्रतिबिंब हासणारे

माझ्याच लोचनांना...
माझ्याच लोचनांना झाले अनोळखी मी
कळले न पाऊले की...
कळले न पाऊले की सोडुनी जाती भूमी

येती कसे फुलुनी...
येती कसे फुलुनी अंगावरी शहारे
पाण्यातले पहाता प्रतिबिंब हासणारे
...प्रतिबिंब हासणारे

मज पाहू-पाहू वाटे अवघी निसर्ग शोभा
मज पाहू-पाहू वाटे अवघी निसर्ग शोभा
माझा नि सृष्टीचा या आहे जुना घरोबा

धन-दौलती सुखाच्या...
धन-दौलती सुखाच्या उघडुनी देती दारे
पाण्यातले पहाता प्रतिबिंब हासणारे
...प्रतिबिंब हासणारे

नसता मनात माझ्या...
नसता मनात माझ्या मज आज सौख्य भेटे
ओठात हे सुखाचे...
ओठात हे सुखाचे सुमधूर गीत येते

मनी मोर धुंद होती...
मनी मोर धुंद होती उभवूनिया पिसारे
पाण्यातले पहाता प्रतिबिंब हासणारे
...प्रतिबिंब हासणारे

आले मनात नवखे...
आले मनात नवखे उमलून भाव सारे
पाण्यातले पहाता प्रतिबिंब हासणारे
...प्रतिबिंब हासणारे



Credits
Writer(s): Gangadhar Mahambare, Shrinivas Khale
Lyrics powered by www.musixmatch.com

Link