Aali Aali Sar Hi

आली-आली...
आली-आली सर ही ओली
खुलवित धुंद अशी बरसात
आली-आली...

छुमछुम पैंजण पायी बांधून
छुमछुम पैंजण पायी बांधून
सजले मी दिन-रात

आली-आली सर ही ओली
खुलवित धुंद अशी बरसात
आली-आली...

मला प्रितीची झाली बाधा
गोकुळची झाले राधा
ओ, मला प्रितीची झाली बाधा
गोकुळची झाले राधा

नंदनवन खुलले, फुलले माझिया हृदयात
आली, आली, आली, आली सर ही ओली
खुलवित धुंद अशी बरसात
आली-आली...

हसते मजला यमुनेचे जळ
हसते मजला यमुनेचे जळ
कदंब हसतो गाली अवखळ
कदंब हसतो गाली अवखळ

हरिची मुरली मधुर छेडिते धून नवी अधरात
आली, आली, आली, आली सर ही ओली
खुलवित धुंद अशी बरसात
आली-आली...

दृष्ट लागू नये सौख्याला
अनुपम या सौभाग्याला
दृष्ट लागू नये सौख्याला
अनुपम या सौभाग्याला

मोद मनी मानसी दाटे मावे ना गगनात
आली, आली, आली, आली सर ही ओली
खुलवित धुंद अशी बरसात
आली-आली...



Credits
Writer(s): Gangadhar Mahambare, Shrinivas Khale
Lyrics powered by www.musixmatch.com

Link