Nabh Utaru Aala

हो, नभ उतरू आलं, चिंब थरथर वलं
अंग झिम्माड झालं हिरव्या बहरात
हो, नभ उतरू आलं, चिंब थरथर वलं
अंग झिम्माड झालं हिरव्या बहरात
हो, नभ उतरू आलं...
अशा वलंस राती गळा शपथा येती
अशा वलंस राती गळा शपथा येती
साता जल्माची प्रीती...
अशा वलंस राती गळा शपथा येती
साता जल्माची प्रीती, सरलं दिन-रात
...सरलं दिन-रात

(हो, नभ उतरू आलं, चिंब थरथर वलं)
(अंग झिम्माड झालं हिरव्या बहरात)
हो, नभ उतरू आलं...
वल्या पाण्यात पारा, एक गगन धरा
वल्या पाण्यात पारा, एक गगन धरा
तसा तुझा उबारा सोडून रित-भात
...सोडून रित-भात

(हो, नभ उतरू आलं, चिंब थरथर वलं)
(अंग झिम्माड झालं हिरव्या बहरात)
हो, नभ उतरू आलं...
नगं लागट बोलू, उभं आभाळ झेलू
नगं लागट बोलू, उभं आभाळ झेलू
गाठ बांधला शालू...
नगं लागट बोलू, उभं आभाळ झेलू
गाठ बांधला शालू तुझ्याच पदरात
...तुझ्याच पदरात

(हो, नभ उतरू आलं, चिंब थरथर वलं)
(अंग झिम्माड झालं हिरव्या बहरात)
हो, नभ उतरू आलं, चिंब थरथर वलं
अंग झिम्माड झालं हिरव्या बहरात



Credits
Writer(s): Hridaynath Mangeshkar, N D Mahanor
Lyrics powered by www.musixmatch.com

Link