Tu Kuthe Mi

तू कुठे, मी कुठे, कोण छेडते कुणा?
तू कुठे, मी कुठे, कोण छेडते कुणा?
राग का गं असा सांगना?
राग का गं असा सांगना?

वाट वेडीपीशी, वेळ ही पुन्हा अशी
वाट वेडीपीशी, वेळ ही पुन्हा अशी
तोल सांभाळूनी चाल ना
तोल सांभाळूनी चाल ना, चाल ना, चाल ना, हा

वाट ही वाकडी त्यात काटेकुटे
पाय नाजूक हे चालती एकटे
वाट ही वाकडी त्यात काटेकुटे
पाय नाजूक हे चालती एकटे

हात देऊ जरा, जीव हो घाबरा
हात देऊ जरा, जीव हो घाबरा
ठेच लागेल की थांबना
ठेच लागेल की थांबना, थांबना, थांबना, हा

दूर जासी तरी दृष्टी मागे वळे
ओढ लगे तुला ते मला ही कळे
दूर जासी तरी दृष्टी मागे वळे
ओढ लगे तुला ते मला ही कळे

येई गे माणिनी, भोवती ना कुणी
येई गे माणिनी, भोवती ना कुणी
का स्वतःची अशी वंचना
का स्वतःची अशी वंचना, वंचना, वंचना, हा

राग आहे खरा की बहाणा म्हणू
प्रीतीचा की गुलाबी उखाणा म्हणू
राग आहे खरा की बहाणा म्हणू
प्रीतीचा की गुलाबी उखाणा म्हणू

ओठ चावू नको, धाक दावू नको
ओठ चावू नको, धाक दावू नको
एक भोळे हसू हासना
एक भोळे हसू हासना, हासना, हासना, हा

तू कुठे, मी कुठे, कोण छेडते कुणा?
राग का गं असा सांगना?
वाट वेडीपीशी, वेळ ही पुन्हा अशी
तोल सांभाळूनी चाल ना
तोल सांभाळूनी चाल ना



Credits
Writer(s): Shanta Shelke, Sudhir Fadke
Lyrics powered by www.musixmatch.com

Link