Majhya Ladkya Re

माझ्या लाडक्या, माझ्या लाडक्या
माझ्या लाडक्या रे, कधी येशील दिठीत?
"वेडी", म्हणूनिया मला घेशील मिठीत
"वेडी", म्हणूनिया मला घेशील मिठीत

चंद्र वर गगनात, खाली कुमुदिनी
चंद्र वर गगनात, खाली कुमुदिनी
आलिंगन देते तंया सुखावते मणी
आवेगात वाहे ओघ, कोण रोधी त्याला?

अखेरीस मिळणार नदी सागराला
अखेरीस मिळणार नदी सागराला
अखेरीस मिळणार नदी सागराला

आड येते रातभर कमळाचे पान
आड येते रातभर कमळाचे पान
साद देती एकमेका चक्रवाक दोन
अंती सरतो दुरावा सूर्य उगवता

विरहाची मिलनात होते ना सांगता
विरहाची मिलनात होते ना सांगता

तुला-मला जोडणारा अनामिक दुवा
तुला-मला जोडणारा अनामिक दुवा
साता आभाळांच्या पार स्वर्ग आहे नवा
वाऱ्यावर तरतांना येईल उभारी

पंख पसरून उंच घेऊया भरारी
पंख पसरून उंच घेऊया भरारी

तिमिराने नाही ना रे, गिळली पहाट
तिमिराने नाही ना रे, गिळली पहाट
काट्या-कुट्यातही पुढे चालते ना वाट

वठलेल्या झाडालाही फुटेल ना पान
वठलेल्या झाडालाही फुटेल ना पान
शिशिराला वसंताचे आहे वरदान
शिशिराला वसंताचे आहे वरदान

दोन ओठ परी त्यांचा एक आहे बोल
दोन ओठ परी त्यांचा एक आहे बोल
दोन चरणांची आहे एकच की चाल
दोन डोळे त्यात पण बिंब एक डोले

तुझे-माझे जग आता एकरूप झाले
तुझे-माझे जग आता एकरूप झाले
एकरूप झाले, एकरूप झाले



Credits
Writer(s): Shanta Shelke, Sudhir Fadke
Lyrics powered by www.musixmatch.com

Link