Daate Dhuke

आसू भरल्या माझ्या पापण्या ओल्या
चालावे किती प्रश्न हा पुन्हा
सावल्या सरल्या वाटा पार भरकटल्या
शोधाव्या किती हरवल्या खुणा
फरफट चाले भासांची
घुसमट होते श्वासांची
वणवण भटकतो एकटा पुन्हा
दाटे धुके भोवती
फसवे आज का माझ्या मना
झाली सजा का अशी
घडला हा काय माझा गुन्हा

चाललो मी कुठे ना कळे काही
सोबती एक ही सावली नाही
हुंदका दाटला आज का माझा
चाहुलीं भोवती पाऊले नाही
उलगडले ना काहीही
गुरफटल्या दिशा दाही
वणवण भटकतो एकटा पुन्हा
दाटे धुके भोवती
फसवे का आज माझ्या मना
झाली सजा का अशी
घडला हा काय माझा गुन्हा

चेहरा आपला ना केव्हा कुठे दिसला
बदलावा किती रोज आरसा
दोन वळणे ही ओळख ना सुचे काही
गर्दीतून ह्या हरवला ठसा

हो. चांदना सापडे सांजच्या वेळी
का अशी याद ही या जीवा जाळी
कोरडा हुंदका आज सोसना
दाटली आसवे वाहती झाली
नकळत वावटळ उठते
भवरा जिंदगी होते
वणवण भटकतो एकटा पुन्हा
दाटे धुके भोवती
फसवे का आज माझ्या मना
झाली सजा का अशी
घडला हा काय माझा गुन्हा



Credits
Writer(s): Mandar Cholkar, Prafule Karlekar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link