Ye Ata

कळले ना कधी मन झाले पारा?
कळले ना कधी रुणझुणल्या तारा?
कळले ना कधी श्वासातून माझ्या का गंध तुझा दरवळतो सारा?
भुलवते मला चाहूल तुझी अन भास तुझा रे
तुझी-तुझी जणू ही नशा
मागते आता मन साथ तुझी, सहवास तुझा रे
जीव तुझ्यात हा गुंतला

ये आता तू मिठीत या, हरवून जा जरा
ये आता तू मिठीत या, हरवून जा जरा

कळले नाही एकाएकी कशी रे झाली बाधा ही अशी
कळले नाही बघता-बघता कधी रे झाली राधा मी तुझी
अधीर, उतावीळ होते मन, बावरे तुझ्याविन
नकळत माझ्या मोहरी मनावर रंग तुझा रे
मागते आता मन साथ तुझी, सहवास तुझा रे
जीव तुझ्यात हा गुंतला

ये आता तू मिठीत या, हरवून जा जरा
ये आता तू मिठीत या, हरवून जा जरा

झरले काही, विरले काही, उरले नाही माझी मी मला
येना-येना, देना माझी स्वप्ने वेडी सारी तू मला
सुतूर मनाशी बंध असे बांधते पुन्हा-पुन्हा
खुलवतो मला आधार तुझा, विश्वास तुझा रे
मागते आता मन साथ तुझी, सहवास तुझा रे
जीव तुझ्यात हा गुंतला

ये आता तू मिठीत या, हरवून जा जरा
ये आता तू मिठीत या, हरवून जा जरा



Credits
Writer(s): Vishal Mishra, Guru Thakur
Lyrics powered by www.musixmatch.com

Link