Ghatanechya Paanawar

सर्व जगावर ठसा उमटवला
सर्व जगावर ठसा उमटवला
कीर्तीचा हा प्रभाव

घटनेच्या पहिल्या पानावरती
गाजतंय माझ्या भिमाचं नाव
घटनेच्या पहिल्या पानावरती
गाजतंय माझ्या भिमाचं नाव

(माझ्या भिमाचं नाव गाजतंय)
(माझ्या भिमाचं नाव...)
(माझ्या भिमाचं नाव गाजतंय)
(माझ्या भिमाचं नाव...)

होती गुलामी, गळ्याला दोरी
राष्ट्रगीत म्हणाया चोरी
होती गुलामी, गळ्याला दोरी
राष्ट्रगीत म्हणाया चोरी

साक्ष पुरावा देईल सारी
साक्ष पुरावा देईल सारी
ती २६ जानेवारी

तशा तुफानी माझ्या भिमानी
तशा तुफानी माझ्या भिमानी
किनारी लावलीया नाव

घटनेच्या पहिल्या पानावरती
गाजतंय माझ्या भिमाचं नाव
घटनेच्या पहिल्या पानावरती
गाजतंय माझ्या भिमाचं नाव

(माझ्या भिमाचं नाव गाजतंय)
(माझ्या भिमाचं नाव...)
(माझ्या भिमाचं नाव गाजतंय)
(माझ्या भिमाचं नाव...)

होतं ओसाड पिकवलं रान
विद्यापती असा विद्वान
होतं ओसाड पिकवलं रान
विद्यापती असा विद्वान

असं देशाला दिलंया दान
असं देशाला दिलंया दान
ग्रंथ मौलिक संविधान

लोकशाहीला मुजरा करती
लोकशाहीला मुजरा करती
रंक आणि ते राव

घटनेच्या पहिल्या पानावरती
गाजतंय माझ्या भिमाचं नाव
घटनेच्या पहिल्या पानावरती
गाजतंय माझ्या भिमाचं नाव

(माझ्या भिमाचं नाव गाजतंय)
(माझ्या भिमाचं नाव...)
(माझ्या भिमाचं नाव गाजतंय)
(माझ्या भिमाचं नाव...)

काळी रात काळात ढळली
नवी प्रभा अशी उजळली
काळी रात काळात ढळली
नवी प्रभा अशी उजळली

महती भीमाची जगाला कळली
महती भीमाची जगाला कळली
भाग्य रेषा ही देशाची जुळली

देश क्रांतीच्यासाठी उत्तम
देश क्रांतीच्यासाठी उत्तम
केला इथे उठाव

घटनेच्या पहिल्या पानावरती
गाजतंय माझ्या भिमाचं नाव
घटनेच्या पहिल्या पानावरती
गाजतंय माझ्या भिमाचं नाव

(माझ्या भिमाचं नाव गाजतंय)
(माझ्या भिमाचं नाव...)
(माझ्या भिमाचं नाव गाजतंय)
(माझ्या भिमाचं नाव...)

सर्व जगावर ठसा उमटवला
सर्व जगावर ठसा उमटवला
कीर्तीचा हा प्रभाव

घटनेच्या पहिल्या पानावरती
गाजतंय माझ्या भिमाचं नाव
घटनेच्या पहिल्या पानावरती
गाजतंय माझ्या भिमाचं नाव

(माझ्या भिमाचं नाव गाजतंय)
(माझ्या भिमाचं नाव...)
(माझ्या भिमाचं नाव गाजतंय)
(माझ्या भिमाचं नाव...)
(माझ्या भिमाचं नाव गाजतंय)
(माझ्या भिमाचं नाव...)



Credits
Writer(s): Madhukar Pathak, Anand Shinde, Harshad Shinde, Uttam Kamble
Lyrics powered by www.musixmatch.com

Link