Nate He Konte

बरसते उन्हात चांदणे जणू
बदलती क्षणात रंग हे ऋतू
बरसते उन्हात चांदणे जणू
बदलती क्षणात रंग हे ऋतू
मला कळेना कशी ही जादू
कशी कळावी कोणास सांगू

असे मनातल्या मनातले
भास कि खरेचं जग म्हणू

नाते हे कोणते? कोणास ना कळले कधी
नाते हे कोणते? कोणास ना कळले कधी

गुंतणे वाटे हवे-हवे, शोधते आता कुणात मी
स्वतःस का उगाच हरवूनी मी राहते?
गुंतणे वाटे हवे-हवे, शोधते आता कुणात मी
स्वतःस का उगाच हरवूनी मी राहते?
आता नभात माझ्या विखुरले तुझेचं रंग हे जणू
आता मनात माझ्या राहते तुझेचं रूप हे जणू

असे मनातल्या मनातले
भास कि खरेचं जग म्हणू

नाते हे कोणते? कोणास ना कळले कधी
नाते हे कोणते? कोणास ना कळले कधी

रंग हे सारे नवे-नवे, चालते आता ही पायवाट
जायचे कुठे मला आता हे ना कळे
रंग हे सारे नवे-नवे, चालते आता ही पायवाट
जायचे कुठे मला आता हे ना कळे
कसे मनास वेड्या, लागले तुझेचं वेड हे जणू
मला जागवी का मखमली तुझेचं स्वप्न हे जणू?

असे मनातल्या मनातले
भास कि खरेचं जग म्हणू

नाते हे कोणते? कोणास ना कळले कधी
नाते हे कोणते? कोणास ना कळले कधी



Credits
Writer(s): Avinash Vishwajeet, Vishwajeet Joshi
Lyrics powered by www.musixmatch.com

Link