Kon Jane

कोण जाने? काय जुळले?
भावनांना हि न कळले
कोण जाने? काय जुळले?
भावनांना हि न कळले

कालचे परके, कुणीचे
हो, कालचे परके, कुणीचे
काळजाला आज भिडले

चालता-चालता सोबती मी असे
ना कळे, का नको वाट ते थांबणे?
चालता-चालता सोबती मी असे
ना कळे, का नको वाट ते थांबणे?

नेमके हे कुठे धावणे तुझे?
का कधी ना कळले कुणा वागणे तुझे
का असे रे ऐन वेळी हे तुझे हरवणे?
सापडेना ओळखीची अजूनही वाट का तुला रे?
गुंतल्या मना

चालता-चालता सोबती मी असे
ना कळे, का नको वाट ते थांबणे?
चालता-चालता सोबती मी असे
ना कळे, का नको वाट ते थांबणे?

उत्तरे शोधती प्रश्न हे नवे
बंध का नकळते असे वाटती हवे
सोडताना हात का हे गुंतणे उमगते?
ओढ लागे हि कशाची
थबकती पावले कशाला ही पुन्हा-पुन्हा

चालता-चालता सोबती मी असे
ना कळे, का नको वाट ते थांबणे?
चालता-चालता सोबती मी असे
ना कळे, का नको वाट ते थांबणे?



Credits
Writer(s): Guru Thakur, Avinash Vishwajeet
Lyrics powered by www.musixmatch.com

Link