Yei Ho Vitthale

येई हो विठ्ठले माझे माऊली ये
(येई हो विठ्ठले माझे माऊली ये)
निढळावरी कर, हो
निढळावरी कर ठेवुनी वाट मी पाहे
ठेवुनी वाट मी पाहे

(येई हो विठ्ठले माझे माऊली ये)
(येई हो विठ्ठले माझे माऊली ये)

आलिया-गेलीया हाती धाडी निरोप
आलिया-गेलीया हाती धाडी निरोप
पंढरपुरी आहे, हो
पंढरपुरी आहे माझा मायबाप
माझा मायबाप

(येई हो विठ्ठले माझे माऊली ये)
(येई हो विठ्ठले माझे माऊली ये)

पिवळा पितांबर कैसा गगनी झडकला
पिवळा पितांबर कैसा गगनी झडकला
गरुडावरी बैसोनी, हो
गरुडावरी बैसोनी माझा कैवारी आला
माझा कैवारी आला

(येई हो विठ्ठले माझे माऊली ये)
(येई हो विठ्ठले माझे माऊली ये)

विठोबाचे राज आम्हा नित्य दिपवाळी
विठोबाचे राज आम्हा नित्य दिपवाळी
विष्णुदास नामा, हो
विष्णुदास नामा जीवे-भावे ओवाळी
जीवे-भावे ओवाळी

(येई हो विठ्ठले माझे माऊली ये)
(येई हो विठ्ठले माझे माऊली ये)



Credits
Writer(s): Traditional, Nandu Honap
Lyrics powered by www.musixmatch.com

Link