Aarti Saibaba

आरती साईबाबा, सौख्यदातार जीवा
चरण रजतळी, द्यावा दासा विसावा, भक्ता विसावा
(आरती साईबाबा, सौख्यदातार जीवा)
(चरण रजतळी, द्यावा दासा विसावा)
(भक्ता विसावा, आरती साईबाबा)

जाळुनिया अनंग, सस्वरुपी राहे दंग
मुमुक्षुजना दावी, निज डोळा श्रीरंग, डोळा श्रीरंग
(आरती साईबाबा, सौख्यदातार जीवा)
(चरण रजतळी, द्यावा दासा विसावा)
(भक्ता विसावा, आरती साईबाबा)

जया मनी जैसा भाव, तया तैसा अनुभव
दाविसी दयाधना, ऐसी तुझी ही माव, तुझी ही माव
(आरती साईबाबा, सौख्यदातार जीवा)
(चरण रजतळी, द्यावा दासा विसावा)
(भक्ता विसावा, आरती साईबाबा)

तुमचे नाम ध्याता, हरे संसृतिव्यथा
आगाध तव करणी, मार्ग दाविसी अनाथा, दाविसी अनाथा
(आरती साईबाबा, सौख्यदातार जीवा)
(चरण रजतळी, द्यावा दासा विसावा)
(भक्ता विसावा, आरती साईबाबा)

कलियुगी अवतार, सगुण ब्रह्म साचार
अवतीर्ण झालासे, स्वामी दत्त दिगंबर, दत्त दिगंबर
(आरती साईबाबा, सौख्यदातार जीवा)
(चरण रजतळी, द्यावा दासा विसावा)
(भक्ता विसावा, आरती साईबाबा)

आठा दिवसा गुरुवारी, भक्त करिती वारी
प्रभुपद पहावया, भवभय निवारी, भय निवारी
(आरती साईबाबा, सौख्यदातार जीवा)
(चरण रजतळी, द्यावा दासा विसावा)
(भक्ता विसावा, आरती साईबाबा)

माझा निजद्रव्य ठेवा, तव चरणरजसेवा
मागणे हेचि आता, तुम्हा देवाधिदेवा, देवाधिदेवा
(आरती साईबाबा, सौख्यदातार जीवा)
(चरण रजतळी, द्यावा दासा विसावा)
(भक्ता विसावा, आरती साईबाबा)

ईच्छित दीन चातक, निर्मल तोय निजसुख
पाजावे माधवा या, सांभाळ आपुली भाक, आपुली भाक
(आरती साईबाबा, सौख्यदातार जीवा)
(चरण रजतळी, द्यावा दासा विसावा)
(भक्ता विसावा, आरती साईबाबा)

आरती ज्ञानराजा, महा कैवल्य तेजा
सेविती साधु-संत, मनु वेधला माझा, वेधला माझा
(आरती ज्ञानराजा, महा कैवल्य तेजा)
(सेविती साधु-संत, मनु वेधला माझा)
(वेधला माझा, आरती ज्ञानराजा)

लोपलें ज्ञान जगीं, हित नेणती कोणी
अवतार पांडुरंग, नाम ठेविलें ज्ञानी, ठेविलें ज्ञानी
(आरती ज्ञानराजा, महा कैवल्य तेजा)
(सेविती साधु-संत, मनु वेधला माझा)
(वेधला माझा, आरती ज्ञानराजा)

कनकाचे ताट करीं, उभ्या गोपिका नारी
नारद तुंबरू हो, साम गायन करीं, गायन करीं
(आरती ज्ञानराजा, महा कैवल्य तेजा)
(सेविती साधु-संत, मनु वेधला माझा)
(वेधला माझा, आरती ज्ञानराजा)

प्रगट गुह्य बोले, विश्व ब्रह्मचि केलें
रामा जनार्दनीं, पायीं मस्तक ठेविलें, मस्तक ठेविलें
(आरती ज्ञानराजा, महा कैवल्य तेजा)
(सेविती साधु-संत, मनु वेधला माझा)
(वेधला माझा, आरती ज्ञानराजा)



Credits
Writer(s): Traditional, Nandu Honap
Lyrics powered by www.musixmatch.com

Link